Posts

तुला पाहतो गं..

Dharmadhikari Production's https://youtu.be/feIYanmzM2Y बहुतेकांच्या मनाच्या छोट्याश्या एका कोपऱ्यात ती लपून बसलेली असते ज्यांच्या नशिबात ती येऊन गेलेली असते त्यांना नेहमीच ती सध्या काय करते हा गोड प्रश्न भेडसावत असतो अशीच एका त्याच्या 'ती' ची हि कथुली सांगितली आहे लेखक सादरकर्ते कौस्तुभ केळकर यांनी https://youtu.be/feIYanmzM2Y तुला पाहतो गं.. ♥♥♥ पहा , ऐका Like subscribe आणि share हि करा ♥♥♥

छत्रपती शिवाजी महाराज

*☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆* _______________________________ *१) लखुजी जाधवराव* (जिजाबार्इंचे वडील)- सिंदखेड राजा *२) मालोजीराजे* (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे *३) विठोजीराजे* (शिवरायांचे चुलते)- भातवडी *४) शहाजीराजे*- होदिगेरे, ता. कनकगिरी, जि. दावनगेरे (कर्नाटक) *५) जिजाबाई -* पाचाड (रायगडाच्या पायथ्याला) *६) छत्रपती शिवाजी महाराज*- रायगडावर *७) सईबाई* (शिवरायांच्या पत्नी) - राजगड *८) पुतळाबाई व सोयराबाई* (शिवरायांच्या पत्नी) - रायगड *९) संभाजीराजे* (शिवरायांचे थोरले बंधू) कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल *१०) छत्रपती संभाजी* (शिवरायांचे थोरले पुत्र)- वडू कोरेगाव *११) सखुबाई* (शिवरायांच्या कन्या) माळशिरस, जि. सोलापूर *१२) सूर्यराव काकडे* (शिवरायांचे जवळचे मित्र)- साल्हेरच्या किल्ल्याजवळ. *१३) रामचंद्रपंत अमात्य* (अष्टप्रधान मंडळातील मंत्री)- पन्हाळगडाच्या पायथ्याशी *१४) मकूबाई* (शिवरायांच्या भावजयी) - जिती, ता. करमाळा, जि. सोलापूर *१५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर-* तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड प्रतापराव गु...

चला जगूया आनंदाने

 – आनंदी जीवनासाठी अत्यावश्यक बारा सवयी! – भाग १ सकाळपासुन रात्रीपर्यंत आपण सगळे धावतच असतो. कित्येकवेळा आम्हाला हेच कळत नसते, की आपण जे करत आहोत, ते का करत आहोत? आयुष्य रोज कसले ना कसले धक्के देतच राहतं, कधी सुखाचे आणि कधी दुःखाचे! कधी कधी अशा परिस्थितीला सामोरे कसं जावं हे आपल्याला उमजत नाही, कधी कधी चुकीचं काय आणि बरोबर काय ते आपल्याला ठरवता येत नाही, असं होतं, कारण आपण स्वतःला काही ठराविक चांगल्या सवयी लावुन घेण्यात कमी पडतो. रोजच्या जगण्यात साध्या सोप्या बारा सवयी आत्मसात केल्याने आपण आपले जीवन अजुनच जास्त फुलवु आणि खुलवु शकतो, नैराश्य आणि निरुत्साहाला पळवुन लावु शकतो असा दावा जॉर्डन पीटरसन नावाच्या कॅनडाच्या एका विख्यात मानसशास्त्राने जगासमोर मांडला. जॉर्डन पीटरसन डॉक्टर आहेत, मानसशास्त्राचे प्रोफेसरही आहेत. गेली कित्येक वर्ष हजारो पेशंट्स वर ते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यांचे युट्युबवरचे व्हिडीओज पाहिले की त्यांना ऐकताक्षणीच आपल्याला त्यांच्या बुद्धीमत्तेविषयी आदर वाटु लागतो. आजच्या लेखात मी तुम्हाला आत्मविश्वास वाढवणार्‍या आणि जीवन फुलवणर्‍या त्या बारा सवयीं...

ध्यानसाधना

|| ध्यान (Meditation) || ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे. डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.   *🔔ध्यानाचे फायदे🔔* आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे. ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !               *ताबडतोब बरे होणे* सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक च...

मायबोली मराठी

Image
➰〰➿〰➰ 'ळ' हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे मराठी...!!! आणि म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे! 'ळ' अक्षर नसेल तर पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्‍यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी तीळगूळ कसा खाणार ? टाळे कसे लावणार ? बाळाला वाळे कसे घालणार खुळखुळा कसा देणार घड्याळ नाही तर सकाळी डोळे कसे उघडणार ? घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार वेळ पाळणार कशी ? मने जुळणार कशी ? खिळे कोण ठोकणार ? तळे भरणार कसे ? नदी सागरला मिळणार कशी ? मनातली जखम भळाभळा वाहणार कशी हिवाळा,उन्हाळा, पावसाळा नाही उन्हाच्या झळा नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा ! कळी कशी खुलणार ? गालाला खळी कशी पडणार ? फळा, शाळा मैत्रिणींच्या गळ्यात गळा सगळे सारखे, कोण निराळा? दिवाळी, होळी सणाचे काय ? कडबोळी,पुरणपोळी ओवाळणी पण नाही ? तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ? भोळा सांब , सावळा श्याम जपमाळ नसेल तर कुठून रामनाम ? मातीची ढेकळे नांगरणार कोण? ढवळे पवळे बैल जोततील कोण? पन्हाळ्याच...

काळानुसार बदल हा हवाच

काळानुसार बदलणे महत्त्वाचे १९९८ मध्ये Kodak कंपनीतील १,७०,००० कर्मचारी काम करीत होते ती कंपनी जगातील सर्वात ८५% फोटो पेपर बनवून विकत होते काही वर्षांनंतर Digital photography ने बाजारातून बाहेर काढून टाकले kodak कंपनीच अक्षरशा: दिवाळे निघाले सर्व कामगार रस्त्यावर आले... HMT ( घडी ) BAJAJ (स्कुटर) DYNORA (टीव्ही) MURPHY (रेडिओ) NOKIA (मोबाईल) RAJDOOT (बाईक) AMBASDOR (कार) *या सर्व कंपनीच्या गूणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती, तरीसुद्धा त्या बाजारातून बाहेर पडल्या! कारण??? *त्यांनी वेळे नुसार स्वत:मध्ये  बदल घडवून आणले नाहीत!!! तूम्हाला अंदाज नसेल किं येणार्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज असणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील!! चौथ्या औद्योगिक क्रांती मध्ये आपले स्वागत आहे.... Uber हे फक्त एक Software आहे! त्याची स्वता:ची एकही Car नाही! तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi Company आहे! Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company आहे तरीही तीचं स्वता:चं एकही होटेल नाही! Paytm, Ola cabs, Oyo Rooms यांसारखी खुप उदाहरणे आहेत! US मधल्या यंग...

लावणी

Image
लावणी सळसळत तारुण्य त्याला कसं आवरु ,कसं,कसं सावरु अहो सांगा राया!! , अहो राया सांगा...सांगा ना!! आता सांगा की हो ....सांगा ना कस्सं आवरू SSSS. ... भरला मटका टचकन्‌ टिचला पाणी लागलया घळघळू,... बघा ना SSS बघा की हो SSS त्याला कसं आवरु ,कसं कसं सावरु. अहो सांगा  राया!!  ,अहो राया सांगा... सांगा ना !! कस्सं आवरू SSSS.... घे‌ई भरारी मन पाखरू या फांदीवर त्या फांदीवर लागलया जसं उडू... त्याला कसं आवरु, कसं कसं सावरु अहो सांगा राया!! ,अहो राया सांगा...  सांगा ना!! कस्सं आवरू SSSS .... झाकले...SS,किती दडपले सप्तपटला पटला आडून मन लागे झाकाळू त्याला कसं आवरु ,कसं कसं सावरु अहो सांगा राया!, , अहो राया सांगा,..सांगा ना!! कसं कसं आवरु ...कस्सं सावरू आता सांगा की हो .... कसं आवरू SSSS. ...SSSS... शैलजा वायझाडे