लावणी
लावणी
सळसळत तारुण्य त्याला
कसं आवरु ,कसं,कसं सावरु
अहो सांगा राया!! , अहो राया सांगा...सांगा ना!!
आता सांगा की हो ....सांगा ना
कस्सं आवरू SSSS. ...
भरला मटका
टचकन् टिचला
पाणी लागलया घळघळू,...
बघा ना SSS बघा की हो SSS
त्याला कसं आवरु ,कसं कसं सावरु.
अहो सांगा राया!! ,अहो राया सांगा... सांगा ना !!
कस्सं आवरू SSSS....
घेई भरारी मन पाखरू
या फांदीवर त्या फांदीवर
लागलया जसं उडू...
त्याला कसं आवरु, कसं कसं सावरु
अहो सांगा राया!! ,अहो राया सांगा... सांगा ना!!
कस्सं आवरू SSSS ....
झाकले...SS,किती दडपले
सप्तपटला पटला आडून
मन लागे झाकाळू
त्याला कसं आवरु ,कसं कसं सावरु
अहो सांगा राया!, , अहो राया सांगा,..सांगा ना!!
कसं कसं आवरु ...कस्सं सावरू
आता सांगा की हो .... कसं आवरू SSSS. ...SSSS...
शैलजा वायझाडे
Comments
Post a Comment