बहुरूपी बहिर्जी नाईक - अजय तपकिरे


विविध भूमिका साकारणारे अनेक कलावंत आहेत परंतु विविध स्वरूपाच्या भूमिका ज्याच्याशी एकरूप होऊन जातात असा अव्वल कलावंत...
अभिनयाचा चौकोनी चिरा म्हणजे अजय तपकिरे


    गेल्या अनेक वर्षांपासून ज्यानी अभिनयाची तपश्चर्या करत अनेक भूमिकांमध्ये जीव ओतत त्यांना न्याय मिळवून दिला, काही वर्षांपूर्वी सिल्वर जूब्ली चित्रपट जाऊ तिथे खाऊ च्या निमित्ताने दिग्दर्शक गणेश धर्माधिकारी यांचे परममित्र अजय सरांची ओळख झाली.



सन 1994-95 पासून अजय सर अभिनय कलेचे पाईक आहेत, त्यांनी आजपर्यंत अनेक नाटकां सोबत ब्रम्हांडनायक, कृपासिंधु, लक्ष, माझे मन तुझे झाले, दुर्वा, देवयानी, यासारख्या सिरियल बरोबरच जाऊ तिथे खाऊ, एक गाव दहावी नापास, बाळू मामा मला एक चानस हवा, बरड, आंबट, मेश्री, मळगंगा, अशा अनेक मराठी चित्रपटात तर किस्मत व 'आणा' सारख्या हिंदी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका यशस्वीपणे साकारल्या आहेत, प्रत्येक भूमीकेशी प्रामाणिक होत तिला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड, जिद्द अत्यंत कमालीची आहे, एखाद्या सुगरन गृहिणीच्या हाताने केलेल्या भाजीला पुरता मसाला नसतानाही चव असते, कारण त्यात तिची समरस होण्याची भावना अधिक असते, अगदी तसच अजय जीं नी साकारलेली प्रत्येक कलाकृती अजरामर होते, यामध्ये त्यांच्या कलेविषयी असलेल्या उपजत गुणांचा आविष्कार पाहायला मिळतो. त्यांचा सहज सुंदर अभिनय प्रत्येक वेळी भावतो , सध्या त्यांची सुरू असलेली स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील बहिर्जी नाईक भूमिका त्यांच्या अष्टपैलू कलागुणांचा प्रत्यय देते. आणि एक हरहुन्नरी कलाकार म्हणुन अजय सर बाप माणूस आहेतच, परंतु एक माणूस म्हणुन देखिल राजा माणूस आहेत, कुठल्याही परिस्थितीत माणसाशी मन मिळून राहणार्‍या आणि ईतक्या प्रदीर्घ अनुभवा नंतरही जनमानसातील अकलूज नगरीच्या या अवलिया व्यक्तिमत्त्वाला त्रिवार मानाचा  मुजरा!! व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा!!!
                       शब्दांकन -रवी पंडित








Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अष्टदिशा माहिती

ग. दि. माडगूळकर

Short film reviews film by sairaj