Short film review The Lost Childhood
THE LOST CHILDHOOD
हरवलेलं बालपण.........
नुकताच युट्युबवर व्हिडीओ पहात असताना, अचानकच हि शॉर्टफिल्म समोर आली, फक्त सात मिनीटांची शॉर्टफिल्म, कसलाही संवाद नसलेली, फक्त संगिताच्या पार्श्वभुमिवर, दिग्दर्शकाने सर्व कसब ओतुन दिग्दर्शित केलेली अफलातुन कलाकृती.
शॉर्टफिल्ममधुन एक ज्वलंत विषय मांडण्याचा केलेला प्रयत्न प्रमाणापेक्षा यशस्वी...... मुलांनी ज्या वयात खेळायचे बागडायचे, उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाची दारे ठोठावायची त्या कोवळ्या वयात स्वत:ला जगविण्याच्या जबाबदारीच्या अकाली आलेल्या प्रौढपणाच्या ओझ्याखाली त्यांच्या बालपणाला, बालमनाला दडपण्याचे काम समाजातीलच काही कंटक समाजसेवेच्या नावाखाली करत असतात......
त्या लहान मुलांचं हसण्या खेळण्याचं, स्वच्छंदी फुलपाखरी बालपण कुठेतरी हरवुन जाते, त्या हरवलेल्या बालपणाला व समाजकंटकांच्या कृत्यांना समाजासमोर आणण्याचे काम हि शॉर्टफिल्म सात मिनीटात करुन जाते..
The LOST CHILDHOOD
https://youtu.be/WZG30ngQFC0
पहाटेच्या अर्धवट स्वप्नाळु साखरझोपेतुन जागी होणारी दोन्ही मुले, त्यांच्या चेहऱ्यावर पाडला जाणारा बुलेटचा प्रखर प्रकाशझोत.
दिग्दर्शकाची अफलातुन कल्पना... पहाटेच्या अर्धवट झोपेतुन जागी होणारी मुले म्हणजेच लहानपण विसरुन जगण्याच्या प्रखर प्रकाशझोतापुढे हात टेकलेली, सत्याला सामोरी जाणारी अर्धवट वयातील बालमजुर...... खुप सुंदर कल्पना....... पहिल्याच प्रसंगात दिग्दर्शक दर्शकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होतो.
तसाच दुसरा प्रसंग केर काढतानाचा..... उडणाऱ्या धुरळ्याच्या पार्श्वभुमीवर पेपर वाचणारा हॉटेल मालक, व त्याच मालकाच्या क्लोजअपमधुन पाणी उडवणारा छोकरा, व मालकाच्या अंगावर पाणी उडल्यावर दचकणारा मुलगा....... खुप सुंदर कँमेरा वर्क.!
एका प्रसंगात चहाबरोबर बिस्कीट खायला देणारा मालक...... खरोखर समाजमनाचा खुप खोलवर अभ्यास केल्यानंतर येणारा बारकावा.....
दोन वेळच्या जेवणखाणं व रहाण्याच्या क्षुल्लक किमतीवर लहान मुलांना प्रेमाने राबवुन घेण्याचा बारकावा..... " दोन कटिंग व बिस्कीट " हे त्याचं प्रतिकात्मक रुप मांडताना दिग्दर्शकाने समाजमनाची पकडलेली नाडी दिसुन येते.
फिल्मचे संगीत........ सर्वात सुंदर आवडलेला भाग म्हणजे गिता दत्त च्या आवाजातील शैलेंद्रजींचे गाणे......
" दो चमकती आखोंमें "
" कल ख्वाब सुनहरा था दिखना "
" हाय......... "
" जिंदगी तेरी राहोमें "
" आज अंधेरा है अपना " या गाण्याचा व गाण्याच्या बोलांचा " चहाबिस्कीट " खाताना केलेला खुबीदार वापर...... हा या शॉर्टफिल्मचा आत्मा. संगीतकार संगीताची मस्त छाप सोडुन जातो.
शॉर्टफिल्मचा शेवट......... " येथे बालकामगार काम करत नाहीत. " हा छद्मीपणाने गालात हसत मालकाने लावलेला बोर्ड हा जरी शॉर्टफिल्मचा शेवट असला, तरी त्या पुर्वी मालक दोन्ही बालमजुरांना आता दिवस चालु होतोय आतमध्ये जावा असे खुणावतो. ती मुले आत जाताना, बाहेर येणारा दुसरा तरुण वेटर दाखवुन, दिग्दर्शकाने त्या तरुणाच्या रुपाने त्या दोन्ही लहान मुलांचे दाखवलेले भवितव्य हा या शॉर्टफिल्मचा सर्वांत सुंदर प्रसंग म्हणता येईल. इथे या प्रसंगात दिग्दर्शक पुर्ण फिल्म खिशात घालतो.
फिल्ममध्ये लहान मुलांकडुन अजुनही जरा अँक्टीग करुन घेता आली असती, हॉटेलमालकाने दाखवलेला रुबाब योग्यच..! एकुणच एक ज्वलंत विषय व त्याचे हुशार दिग्दर्शकाने केलेले सोने.... असेच या शॉर्टफिल्मचे वर्णन मी करेन.
या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. गणेश धर्माधिकारी, निर्माता श्री.मिहीर रणदिवे व त्यांच्या टिमने केलेल्या एका अप्रतिम कलाकृतीचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा व तिला भरघोस लाईक द्यावेत जेणेकरुण श्री. धर्माधिकारी व त्यांच्या टिमचा उत्साह द्विगुणीत होईल.
आपलाच,....
डॉ. रवींद्र वेदपाठक.
तळेगाव.
पब्लिसिटी रणजित पवार
https://youtu.be/WZG30ngQFC0
शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करा

Nice review post
ReplyDelete