मातीचे गोळे - Swati Kothekar






 For All pregnant women
 your attention please.....
आज माझा मुलगा दहावीत आहे. पण तो दीड वर्षाचा असताना, मला एक दिवस ट्रेनमध्ये एक बाई भेटली.. आणि मुलांना वाढवताना म्हणून तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या.. पुढील आयुष्यात त्याचा मला फार फार उपयोग झाला. आणि माझ्या मुलाला सुद्धा.. आज तो माझा मुलगाच नाही तर एक खूप चांगला मित्र सुद्धा आहे.. ज्याच्या सोबत मी काहीही.. अगदी काहीही शेअर करू शकते.अगदि एका बेस्ट फ्रेंड सारखच..  शिवाय मला स्वयंपाकाचा कंटाळा आला तर थोडेफार बनवायला त्यालाही शिकवलंय मी..
 मुलगा असला तरी तासंतास मी त्याच्याशी गप्पा मारू शकते. त्याला डिप्रेस्ड झालं तर तो हक्काने सांगतो काहीतरी मस्त प्लॅन कर मला तुझ्या सोबत वेळ घालवायचाय छान..
बर ते जाऊदे.. काही न सांगता काहीतरी काम येणारी गोष्ट सांगते.. ऐका..
 ज्या प्रेग्नंट आहेत त्यांच्यासाठी काही टिप्स..
1. रोज पोटावर हात ठेवून बाळासोबत तुमची सुखदुःख शेअर करा.
2. तुम्ही काय करताय किंवा काय करणार आहात याविषयी त्याला कल्पना द्या.
3. झोपताना न चुकता बासरीवादन मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ते रोज ऐका.
( यामुळे मुलांचा राईट आणि लेफ्ट दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह होतात)
4. भरपूर वाचन करा. (आता वेळ मिळत नाही म्हणायचं नाही हा तो काढला की मिळतोच)
 हे झालं प्रेग्नेंट मैत्रीणींसाठी साठी..
 आता अशा मैत्रिणींसाठी.. ज्यांची मुले शून्य ते बारा वर्षांपर्यंतचे आहेत.
 त्यासाठी आधी हे लक्षात घ्या की शून्य ते 12 वर्षांपर्यंत मेंदूची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे माती ओली असतानाच तिला योग्य तो आकार द्यायला हवा. संस्कार संस्कार तरी कशाला म्हणतो आपण मुलं केवळ आपलं अनुकरण करत असतात त्यामुळे या काळात स्वतःमध्ये ही थोडा बदल करायलाच हवा या संदर्भातली पोस्ट नंतर शेअर करुनच.



Swati Kothekar: #All pregnant women in this group...
Your Attention Please... (Part 2)
मागच्या पोस्टला छान प्रतिसाद दिलात म्हणून आज ज्या मैत्रिणींची मुलं शून्य ते बारा वर्षांपर्यंतची आहेत त्याच्यासाठी काही उपयुक्त माहिती..
मागे सांगितल्याप्रमाणे शून्य ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या मेंदूचा विकास अगदी झपाट्याने होत असतो, म्हणून जर मुलांच्या या वयातच आपण थोडे लक्ष दिले तर आपण एक चांगली पिढी नक्कीच घडवू शकतो.
 प्रत्येक मूल स्पेशल असतं पण त्यांना स्पेशल बनवण्यासाठी आपण थोडा प्रयत्न करूयात. सर्वप्रथम ज्या मैत्रिणींची मुले 0 ते 3 वर्षांची आहेत.. (होय यामध्ये 0 याचा अर्थ मुलं काही दिवसांचे आहे) त्यांच्यासाठी काही उपयुक्त गोष्टी.. १.बाळाशी रोज बोला.
२.एका पेजवर मराठीतली दोन नावे (सुरुवात श्रीगणेशापासून  अथवा आई या अक्षरापासून करा) आणि इंग्रजीतली दोन नावे लिहा. ही नावे लाल स्केचपेनने लिहा कारण लाल रंग मुलांना पटकन आकर्षित करतो. ही नावे त्यांच्या नजरेसमोर रोज एकदा सकाळी एकदा रात्री दाखवा. यामुळे मुलांची नजर तयार होते व त्याचा शालेय जीवनात खूप फायदा होतो.
३. त्यांना रोज मोकळ्या हवेत घेऊन जा.
४. मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांना मातीत खेळू द्या. मातीत चिखलात खेळल्याने मुलांच्या मेंदूच्या काही पेशी ऍक्टिव्ह होतात.
५. रोज एक वेळ ठरवून त्या वेळी नकाशा वाचन करा. भारत देशाचा व नंतर जगाचा नकाशा दाखवा.  यामध्ये तुम्ही  रोज  2 स्टेट्स अथवा दोन देश दाखवू शकतात.  हे दाखवताना एखाद्या पट्टीचा वापर करा. नीटनेटकेपणा मुलं अशीच शिकतात.
६. अजून एक काम करू शकतात.. जर मनावर घेतलं तर.. एका ड्रॉईंग बुक मध्ये वेगवेगळ्या विषयांचे चित्र चिकटवा जसे वॉटर ट्रान्सपोर्ट, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इत्यादी.. पण लक्षात ठेवा एका पेजवर फक्त तीनच चित्र.. मुलं जितकी लहान तितकी पेजवरील चित्रांची संख्या कमी.. हे सुद्धा रोज ठरवलेल्या वेळी दाखवा..



Swati Kothekar: For all pregnant women and beautiful moms in this group
तो ना ऐकतच नाही एकदा सांगून ...त्याच्या लक्षातच राहत नाही.. बाहेर गेलो की खूप मस्ती करतो... मुलगा हुशार आहे हो पण अभ्यासच करत नाही.. थोडा वेळ बसलं की झालं म्हणतो... आजकाल मोबिल नाही मिळाला तर हायपर होतो. बाबा बाहेर गावी गेले की ताप काढतो. सतत सर्दी असते त्याला... सांगितलेले ऐकायचं नसत.. अभ्यास लक्षात राहत नाहीव. वाचायची आवड नाही.. लिहायला आवडत नाही... कंटाळा करतो..लिहायला आवडत नाही. नीट जेवत नाही. बाहेरच ऐकून घरात काही-बाही बोलतो.उलट उत्तर देतो... आणि बराच काही... किती आईंच्या अशा तक्रारी आपल्या मुलांबद्दल आहेत?बरं असू देत.. आज यावर उपाय करूयात.त्याआधी थोड माझ्याविषयी....
माझा मुलगा लहान असताना सासूबाई नेहमी सांगायच्या की झोपेत त्याच्या कानात काही चांगल सांगत जा.. पण माझी बालबुद्धी होती ना! परत सासूच सांगतेय म्हंटल्यावर मी कशाला ऐकतेय मेली? (नाही नाही..... मला ते फार लवकरच पटलं पण...) मला आपल वाटायचं मुलगा झोपलाय म्हंटल्यावर घ्या आराम करून आधी.... नाहीतरी तो रात्री जम जागवायचा दुधासाठी...
मग एक दिवस जादूच झाली... बाळंतपणासाठी मी माहेरी... नवरा जेव्हा मला आणि बाळाला भेटायला आला तेव्हा त्याने मुलगा झोपलेला असताना त्याच्या कानात हळूच सांगितल.. ‘तू नागपूरला येताना रेल्वेत एकदम शांत झोपून येणार आहेस... कारण एव्हाना त्याला पण जागरणाची सवय झालेली आणि तोही त्या चार दिवसात जामच वैतागलेला आणि काय आश्चर्य मुलगा नासिक ते नागपूर एकदम शांत झोपूनच होता की हो.. दुधासाठी नाही की शी-शु साठी नाही उठला तो. मग अजून एक घटना काही वर्षांनी घडली. मी त्या काळात वेगवेगळे आजार आणि डिप्रेशन ची शिकार झालेले त्यावेळी मी एका councelor कडे गेले असताना त्यांच्या treatment चा एक भाग म्हणून त्यांनी गाढ निद्रेसाठी काही सूचना दिल्या आणि मी गाढ झोपले असताना त्यांनी अहितरी सकारात्मक सूचना दिल्या पण त्याच्या एक आठवड्यातच मला माझ्यात सकारात्मक बदल जाणवू लागला आता हि सगळी कथा सांगण्याचा हेतू हा... की.... मुलं जेव्हा गाढ झोपतात त्यावेळी त्यांना अशा सकारात्मक सूचना (positive instruction)द्या. एक लक्षात ठेवा, त्या सूचना मध्ये कुठलाही नकारात्मक अथवा नाही हा शब्द वापरू नका.. हे असे रोज केल्याने खूप उत्तम परिणाम दिसून येईल.
उदा.
१. बाळा, तू आईने सांगितलेले सगळे ऐकतोस.
२. teacher णे अथवा आई/ बाबाने एकदा शिकवलेले, तू एकदा बघितलेले, एकदा ऐकलेले तुझ्या कायम लक्षात राहतं.
३. तुझ्यात उत्तम नेतृत्व गुण आहेत.
४. तू खूप cooperative आहेस.
५. तू तुझ्या मोठ्या तिला किंवा दडला अभ्यासात मदत करतोस.
६. तूला आईला आणि सगळ्यांना मदत करायला आवडत.
७. तू अभ्यासात अतिशय हुशार आहेस.
८. तुला नवनवीन गोष्टी शिकायची आवड आहे.
९. तुझा तुझ्या कर्तुत्वावर पूर्ण विश्वास आहे.
१०. तू जेवण तुझ्या हातानेच करतोस आणि पानात वाढलेले संपवतोस.
११. तुला सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे खायला आवडतात.
१२. तू नेहमी निरोगी आणि आनंदी असतोस.
यामध्ये एखाद्या मुलाची काही विशिष्ठ समस्या असेल त्यासंबाधीही लिहू शकता आणि सूचना instruction देऊ शकता.




[24/11, 7:15 p.m.] Swati Kothekar: गुलाबजाम 💕
तुम्ही सोनाली कुलकर्णी चा गुलाबजाम हा सिनेमा बघितलाय का गं कुणी? त्यात कशी ती विक्षिप्त सोनाली एक दिवस स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करते नै!
आज माझ्यातल्या त्या सोनालीची गोष्ट सांगणारै..
हं तर झालं असं की... ८ वर्षापूर्वी नवीन घरात शिफ्ट मी सततच आजारी असायचे.. रोज काहीतरी नवीन दुखणं.. रिपोर्ट्स सगळे नॉर्मल.. पण काही कळायला मार्ग नाही.. वजन वाढत होतं आणि मला डिप्रेशन येतं होतं..
मग एक दिवस विचार करत असताना मला काहीतरी भन्नाट सुचलं अचानक!!
लहानपणी संस्कृत हा विषय होता अभ्यासक्रमात..
मग ठरवलं... याचा काहितरी फायदा करून घेता येईल.. आपल्यासोबत समाजाचाहि.. नाहितरी समाजाचं काहितरी देणं लागतोच ना आपण सगळे!
मग हातानेच लिहून थोडे पॅंप्लेट्स तयार केले.. आणि दिले लाऊन बिल्डींग मधे..
झालं... पहिली अ‍ॅडमिशन आली.. मुलगी फक्त पावणे तीन वर्षांची.. मी challenge accept केलं.. घेतली तीला रामरक्षा शिकवायला.. काहि दिवसांतच तीचे आई बाबा सांगत आले.. मुलगी छानच तयार होतेय.. अजून काहीतरी शिकवा.. तीचे आजी आजोबा तर खूपच खूश आहेत हिच्या इवल्याशा तोंडून रामरक्षा ऐकल्यावर..
मग हळूहळू मुलं वाढत गेली... अ‍ॅडमिशन येत गेल्या.. आणि मुलांबरोबर मी सुद्धा शिकत गेले बर्‍याच गोष्टी.. आता माझी कल्पनाशक्ती ही वेगाने धावू लागली.. मी आता माझा पसाराही बऱ्यापैकी वाढवला..
मागे श्रीमान योगी वाचलंच होतं... त्याची परत पारायणं केली.. मग शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली.. आता शिवाजी महाराज म्हटले की गड किल्ले आलेच.. मग ट्रेक पण arrange करायला सुरुवात केली..
मग काय.. यानंतर माझी गाडी सुसाट सुटली..
आता मी लहान मुलांसाठी mud walk, mini treks,  treks, मातीची भांडी बनवणे, बाहुला बाहुली च लग्न यांसारखे अनेक उपक्रम चालवते..
यामधून एक छान सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच पण शरीराच्या छोट्या मोठ्या कुरबुरीही कुठच्या कुठे पळून जायला मदत होते.. So  शरीर पण Fit and Fine च एकदम!!
हां तर सांगायचा मुद्दा असा की.. मागे एकदा एका सखीने पोस्ट टाकलेली.... की सगळे असूनही एकटं वाटतं..
मला सांगायचय अशा सखींना.. आपण सगळ्या जरी  All-rounder नसलो ना तरी आपल्या प्रत्येकीमधे काहीतरी Talent नक्कीच आहे बघा.. त्या आपल्यातल्या आवाजाला ओळखा पाहू आता.. आणि करा सुरुवात नव्या आयुष्याला..
एकमेकिंना प्रोत्साहन देण्यासाठी हा सुंदर ग्रुप आहेच.. माहेरवाशीणीं सारख्या एकमेकांच्या उपयोगी पडत जाऊया..
काळजी कसची करता?? द्या ती वाऱ्यावर सोडून...
Live your life on your terms and conditions..
धन्यवाद!
#स्वानुभव
स्वाती कैलास कोथेकर

Comments

Popular posts from this blog

अष्टदिशा माहिती

ग. दि. माडगूळकर

Short film reviews film by sairaj